Home Breaking News शिवसेनेची बुलंद आवाज मा.खा.संजयजी राऊत साहेब व नासिक जिल्हा संपर्क नेते मा.भाऊसाहेब...

शिवसेनेची बुलंद आवाज मा.खा.संजयजी राऊत साहेब व नासिक जिल्हा संपर्क नेते मा.भाऊसाहेब चौधरी यांचे उद्या २४ आॅक्टोंबर रोजी नांदगाव मतदारसंघात आगमन

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

उद्या दि.२४ आॅक्टों.रविवार रोजी नांदगाव मतदारसंघात शिवसेना पक्षाचे खासदार मा.संजयजी राऊत साहेब तसेच नासिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे विकासकामांच्या
उद् घाटनासाठी शहरात आगमन होणार आहे.आॅक्सिजन प्लांट, मनमाड व नांदगाव तसेच १५ व्या वित्तआयोगातुन १४ कोटींच्या विविध विकासकामांचे भुमिपुजन मा.संजयजी राऊत व भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते होणार असल्याचे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहासअण्णा कांदे यांनी सांगीतले असुन त्याप्रसंगी कार्यकर्ता मे़ळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे तरी सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक ,महीला आघाडी यांच्यासह नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.