Home Breaking News जिगाव प्रकल्पबाधीत शेतकर्यांचे प्रश्र्न निकाली काढा :- अक्षय पाटील

जिगाव प्रकल्पबाधीत शेतकर्यांचे प्रश्र्न निकाली काढा :- अक्षय पाटील

 

शेगाव:- जिगाव प्रकल्पाचे काम चालू झाले तेव्हापासून जळगाव जा. तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांची शेती ही जिगाव प्रकल्पामध्ये बाधीत म्हणुन येते.

त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या मालकीची शेती ही दुःख सुखाच्या प्रसंगांना विकता येत नाही.

तसेच शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा फायदा सुद्धा घेता येत नाही.

या प्रश्र्नांना प्रकल्पाचे काम चालू झाले तेव्हापासून शेतकऱ्यांना ह्या सर्व अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

त्यामुळे प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ निकाली काढावे.

या मागणी करता आज उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग ( जिगाव ) शेगाव यांच्याशी चर्चा केली.

यावेळी अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.