Home Breaking News श्रींच्या दर्शनासाठी शेगाव आलेल्या भाविकाला ॲटो चालकाने मारहाण करून बारा हजार रुपये...

श्रींच्या दर्शनासाठी शेगाव आलेल्या भाविकाला ॲटो चालकाने मारहाण करून बारा हजार रुपये लूटले..दोघां संशयितांना घेतले ताब्यात. गुन्हा दाखल

 

 

शेगाव: येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शना निमित्त आलेल्या भाविकाला ऑटो चालक यांनी मारहाण करून त्याच्या जवळील बारा हजार शंभर रुपये हिसकावून घेतले अशी तक्रार शेगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत शेगाव शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामध्ये येणाऱ्या तळणी पूर्णा येथील शुभम वामनराव इंगळे वय 28 वर्षे हे अमरावती एक्सप्रेस ने 21 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता शेगाव येथे पोहचले. श्रींच्या मंदिराजवळील चौकामध्ये एका अनोळखी इसमाने त्यांना म्हटले की तुम्हाला कमी पैशात रूम भेटून देतो असे बोलून सदर इसमाला ॲटो मध्ये . अटोमध्ये बसल्यानंतर भाविकाने सांगितलं की मला जेवण करायचे आहे सर सदर इसमाने त्याला सांगितले की तुम्हाला 35 रुपये मध्ये भरपेट जेवण मिळते. त्या ठिकाणी घेऊन चालतो असे बोलून दोघांनी सदर भाविकाला ऑटो मध्ये अज्ञात जागेवर नेऊन त्याला चाप्ता बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातील बारा हजार शंभर रुपये काढून घेतले सदर तक्रारीवरून शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन दोघांना संशयावरून ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणले आहेत त्या दोघांना भाविकाने ओळखले वरून आज 22 नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा तीन वाजता शेख शाहरुख शेख करीम 24 वर्ष राहणार काँग्रेस नगर शेगाव व बबलू उर्फ तूर्रम खान मिया खान वय 31 वर्षे राहणार आजाद नगर शेगाव या दोघा विरुद्ध कलम 392 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश कुमार दंदे करीत आहेत