डॉ. बी .आर आंबेडकर समता सांस्कृतिक युवा मंच हिंगणघाट कडून“भिमा कोरेगांव ” विजय दिवस महोत्सव २०२२ उत्साहात साजरा

0
296

 

हिंगणघाट स्थानीक समता मैदान पंचशिल नगर, काजी वार्ड, हिंगणघाट, येथे दि. १ जाने ला भिमा कोरेगाव विजय दिवस महोत्सवाचे आयोजन करवात आले.
सकाळी ८ वाजता महार रेजिमेंटचे माजी सैनिक व समता सैनिक दलाच्या वतिने स्तंभाच्या प्रतिकृतिला पुष्प चक्र वाहुन मान वंदना देण्यात आली व भारतिय बौध्द महासभा व शहरातील सर्व नागरीकांच्या उपस्थितीत सामुहिक त्रिशरण पंचशिल घेण्यात आले. व समता मैदान ते शहराच्या मुख्य मार्गाने फिरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत समता सैनिक दलाच्या मार्गदर्शनाखाली पांढऱ्या सदयत रॅली नेण्यात आली. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रॅलिचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव विजय तामगाडगे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वेशभुषा स्पर्धा घेण्यात आली. व मान्यवरांचे हस्ते विजेता विद्यार्थ्याना पारितोषीके देण्यात आले. तसेच सायं. ६.०० वाजता महाराष्ट्राचे क्रांतीकारी गायक मा. संविधान मनोहरे व संच अमरावती यांच्या गितांच्या माध्यमातून उपस्थित जनतेला प्रबोधन करण्यात आले. व त्यांच्या दोन गीतावर आलेली रक्कम रु. २०५००/- तसेच सोने, चांदी व दागीण्याच्या स्वरुपात बुध्द विहाराच्या उभारण्यात येत असलेल्या सोनेरी कळसाकरीता देणगी देण्यात आली. तसेच फटक्यांची आतिशबाजी करण्यात आली. या महोत्सवाला जिल्हयातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.
या महोत्सवाला यशस्वी करण्याकरीता समता स्पोर्टिंग क्लब व बौध्द महिला मंडळ व लहान मुलांनी विशेष परिश्रम घेवुन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
डॉ.बी आर आंबेडकर समता सांस्कृतिक युवा मंच हिंगणघाट कडून डॉ. बी. आर. आंबेडकर समता सांस्कृतिक युवा मंचचे अध्यक्ष आयु. राजकुमार मेश्राम यांनी सर्व जनतेचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here