Home Breaking News महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ*. येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न…….

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ*. येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न…….

 

डी एस पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

इयत्ता दहावी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते. व्यवसाय मार्गदर्शन शिबिरा मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय महिला तंत्रनिकेतन लातूर येथून मार्गदर्शक सोनाली हरताळकर व अंजली भंडारे या उपस्थित होत्या, यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना तंत्र व अभियांत्रिकी शिक्षण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, यामध्ये असणारे विविध कोर्स, अभ्यासक्रम त्याची आवश्यकता काळाची गरज अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणारी संधी महिलांसाठी सुरक्षित जॉब याविषयी अतिशय चांगल्या पद्धतीची मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंचावर मुख्याध्यापक श्री एस बी कदम सर, श्री.एम डी सय्यद सर श्रीमती पी.पी बरदाळे मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.