दिनांक २१ व २२ मार्चला चार केंद्रांवर प्रशिक्षणाचे आयोजन.
अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक
गडचिरोली:-दिनांक २१ व २२ मार्च-२०२२ ला गडचिरोली जिल्ह्यातील चार प्रशिक्षण केंद्रावर शाळा पूर्वतयारी अभियान या उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.वडसा प्रशिक्षण केंद्रावर कोरची आणि कुरखेडा तालुक्यातील शिक्षक, गडचिरोली प्रशिक्षण केंद्रावर आरमोरी आणि धानोरा तालुक्यातील शिक्षक,चामोर्शी प्रशिक्षण केंद्रावर एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यातील शिक्षक व अहेरी प्रशिक्षण केंद्रावर सिरोंचा आणि भामरागड तालुक्यातील शिक्षक सहभागी होणार आहेत.दिनांक २४ मार्चला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व म्हणजे १०३ केंद्रांवर प्रशिक्षण घेतले जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून सदर उपक्रम मोठ्या उत्साहात सुरू झालेले आहेत.
या उपक्रमांतर्गत विभागस्तरीय प्रशिक्षण चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील कार्यरत घटकांचे चंद्रपूर येथे दिनांक ९ व १० मार्च रोजी घेण्यात आले.
या प्रशिक्षणातील महत्वाचा भाग म्हणजे “शाळापूर्व तयारी मेळावा” होय,कोरोणा कालावधीत ग्रामीण भागांतील इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून कोणतीही शिक्षणाची पार्श्वभूमी नसल्याने ते अंगणवाडी मध्ये किंवा बालवाडी मध्ये जाऊ शकली नाहीत.या मुलांना पुढे जाऊन वाचन,लेखन व गणनपूर्व क्रिया शिकताना कोणताही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि ते व्यवस्थित शिकू शकतील यासाठी हे या अभियानांतर्गत गावागावात उपक्रम राबवून शिक्षणात माता-पालक,युवक,अंगणवाडी सेविका,सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत,स्वयंसेवकांचा सहभाग घ्यावयाचा आहे.
सोबतच या उपक्रमाला प्रथम संस्थेच्या माध्यमातून कृतीयुक सहभाग लाभणार आहे.
जागतिक महामारीमुळे लहान मुलांचे शैक्षणिक जीवन बंदिस्त करून टाकले याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.या मुलांना शाळेमध्ये येण्यापूर्वी घरी माता-पालक यांच्या मदतीने विविध साहित्याच्या माध्यमातून शैक्षणिक कृती करून घ्यावयाच्या आहेत.
जनजागृतीसाठी मेळावे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व शाळा सुरू होण्याच्या दहा दिवस अगोदर शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केले जाईल.
या मेळाव्यामध्ये नाव नोंदणी,शारीरिक विकास,बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास,भाषा विकास व गणन पूर्व तयारी,साहित्य वितरण अशा प्रकारचे विविध स्टॉल लावून त्या स्टॉल मधील साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासाचे मूल्यमापन केल्या जाणार आहे.
त्यानंतर माता पालकांना त्यांच्या मुलाच्या नावाचे विकास पत्र देण्यात येईल व मुलगा कुठे कमी आहे?त्यासाठी त्याला कोणत्या कृतींची गरज आहे?याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन सदर मेळाव्यातच केल्या जाणार आहे.
त्यानंतर गावातील मातांचे गट बांधणी करून या गटाच्या माध्यमातून व गावातील स्वयंसेवकांच्या मदतीने सदर मुलाला कसे मार्गदर्शन करावे? यासाठी माता पालकांना सहकार्य केल्या जाईल. उन्हाळ्यातील दोन महिन्यांमध्ये मातापालकांनी आपल्या मुलांसाठी काही कृती घेणे गरजेचे आहे त्यासाठी त्यांना साहित्यही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
गावागावात आता शिक्षणाचा जागर माता पालकांच्या व गावातील शिक्षणप्रेमी च्या मदतीने शाळेच्या व्यतिरिक्त घरात, समाज मंदिरात व वाड्या वस्तीवर सुरू होणार आहे.
या अभियानामुळे मुलांमध्ये व मातांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे.माझा मुलगा आता उत्तम प्रकारे शिक्षण घेऊ शकेल.त्याची एक प्रकारची शिक्षणाची बैठक तयार होणार आहे.
शाळापूर्वतयारी अभियानाचे टप्पे म्हणजे तालुकास्तरीय प्रशिक्षण व केंद्रस्तरीय प्रशिक्षण व प्रत्यक्ष शाळास्तरावर मिळावे हे सर्व प्रशिक्षण लवकरच नियोजनानुसार पुर्ण केले जाणार आहेत.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले हे पाऊल अतिशय अभिनंदनीय आहे.या उपक्रमाचे
सर्व स्तरावर त्याचे कौतुक होत आहे.आपल्या मुलाच्या शिक्षणात आई म्हणून माझी भूमिका समजून घेणे व त्याला सहकार्य करणे यावर अधिक भर असणार आहे.शाळा-शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावे “उत्सवाप्रमाणे” साजरे होणार आहेत आणि गावातील वातावरण हे
“शिक्षणमय” होणार आहेत हे विशेष…..!






