Home Breaking News धार्मिक भावना दुखावणारा वीडियो वायरल केल्याप्रकरणी एका युवकास अटक

धार्मिक भावना दुखावणारा वीडियो वायरल केल्याप्रकरणी एका युवकास अटक

 

हिंगणघाट शहरातील एका युवकास पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले.
समाजात तेढ निर्माण होऊन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार साजिकअली इरफ़ानअली रा.गौतम वार्ड या २० वर्षीय मुलाने आपल्या मित्राचे मदतीने हिंगणघाट पोलिसांत काल शनिवारी केली,या तक्रारीवरुन पोलिसांनी शहरातील सिंधी कॉलोनी परिसरातील साहिल मोटवानी या युवकास ताब्यात घेतले.त्याने धार्मिक भावना दुखावणारा वीडियो इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याने त्याचेवर गुन्हा नोंद करण्यात आला.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे