Home वर्धा हिंगणघाट शास्त्री वार्ड येथे स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट

हिंगणघाट शास्त्री वार्ड येथे स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट

1056

 

हिंगणघाट दि. 12 एप्रिल
शास्त्री वार्ड, सरकारी गोदामा जवळ राहणार सौ वर्षा राजकुमार खोब्रागडे या संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान घरी स्वयंपाक करताना गॅस शेगडी चालू केली असता रेगुलेटर इथून गॅस लिकेज झाली व आग पकडली तसेच मी बाहेर आली काही वेळातच गॅसचा स्फोट झाला. घरातील भिंतीला गड्डा तसेच फ्रीज ,कूलर ,फॅन, मिक्सर , भांडी ठेवायची रॅक व इतर सामाना चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही लगेच पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला .
सिलेंडरचा स्फोट माहिती घेतली असता सिलेंडर हे सत्यश्री गॅस एजन्सी येथून दुपारी 4 वाजता आणण्यात आले तसेच ते लावले 8 वाजताच्या दरम्यान स्वयंपाकासाठी गॅस शेगडी चालू केली असता रेगुलेटर पासून पेट घेतला.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा