Home Breaking News शहरातील उद्योगाने मुला – मुलीच्या कला गुणांना वाव देण्याकरिता समर कॅम्प आयोजित...

शहरातील उद्योगाने मुला – मुलीच्या कला गुणांना वाव देण्याकरिता समर कॅम्प आयोजित करावे : राजूरेड्डी

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : शहर हा औद्योगिक शहर असून प्रदूषणात हा शहर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आलेला असून येथील नागरिकांचे आयुष्यमान दिवसागणिक कमी होत आहे.

येणाऱ्या भावी पिढीला या जीवघेण्या प्रदूषणा सोबत लढण्याचे बळ देण्याकरिता त्यांना शारीरिक रित्या सशक्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आता शाळांना सुट्ट्या लागल्या असून 05 ते 15 वर्ष वयोगटातील मुला – मुलींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी
उद्योगाने समर कॅम्प आयोजित करावे
या करिता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी एसिसी सिमेंट, लॉयड्स मेटल्स,गुप्ता वॉशरीज,वेकोलीला निवेदनातून मागणी केलेली आहे.