महिलांच्या समस्या बाबत राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी महिला आयोग अध्यक्षांसोबत केली चर्चा

0
87

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव:राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकरRupali chaknkar या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर 13 ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे आलेल्या होत्या. राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी बुलढाणा येथील शासकीय विश्राम भवन येथे रुपालीताई चाकणकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी महिलांच्या विविध समस्या बाबत.

चर्चा करून अपंग विधवा चला ग्रस्त महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा व त्यांच्या इतरही समस्या सोडविण्याबाबत योग्य तो निर्णय आपल्या राज्य महिला आयोगामार्फत घेण्याची विनंती यावेळी माधुरी शर्मा यांनी रूपालीताई यांच्याकडे केली.

सर्वप्रथम माधुरी शर्मा यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारूपालीताई चाकणकर मॅडम तसेच राज्य महिला आयोग सदस्या आभा ताई पांडे मॅडम यांचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या निर्मलाताई तायडे, रेखाताई गवई व अर्चनाताई टाले मॅडम उपस्थित होत्या#rupali chakankar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here