सतत शेतकरी अडचणीत एक तर मदत द्या नाहीतर आमच्यावर गोळ्या झाडा आता आम्हाला दुसरा पर्याय नाही(farmer)

0
4

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Farmer :गेल्या तीन दिवसापासून सिंदखेड राजा आणि किनगाव राजा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून अद्याप शेतकऱ्यांना कुठल्याही शासनाकडून मदतीचा आश्वासन मिळाले नाही म्हणून आम्हाला एक तर मदत द्या

नाहीतर आमच्यावर गोळ्या झाडा याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून आज शेतकरी मित्र सिंदखेड राजा आणि शेतकरी योद्धा कृषी समिती बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन या मंडळामध्ये दिनांक 23/9/2024 ते 25/9/2024 या तीन दिवसात सिंदखेडराजा मंडळामध्ये व किनगाव राजा मंडळामध्ये सतत तीन दिवस अतिवृष्टी झालेली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा ?(relve)

सदर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालेले आहे सोयाबीनचे नुकसान 100% झाल्याचे दिसत असून कपाशीचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याला या नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे.

योग्य ती कारवाई करून सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्याला कशी मिळेल यासाठी आपण स्वतः तात्काळ पाठपुरावा करावा अशी विनंती शेतकरी मित्र दिलीप भाऊ चौधरी व शेतकरी योद्धा कृषी समितीचे समन्वयक बालाजी सोसे यांनी केली.

असून या परिसरामध्ये दिनांक 24 सप्टेंबर रोजी 31.5 मिली व दिनांक 25 सप्टेंबर 67.5 मिली दिनांक 26 सप्टेंबर 38.8 मिली या हा रेनफॉल रिपोर्टनुसार अहवाल असून किनगाव राजा महसूल मंडळ येथील पर्जन्यमापक यंत्रणा पूर्णपणे बंद असून संबंधित तालुका कृषी अधिकारी यांनी त्या यंत्रणेचा पंचनामा केला आणि त्याच पंचनामांमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

की संबंधित सिंदखेडराजा येथील रेन फॉल रिपोर्ट हे किनगाव राजा मंडळाला लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते आणि सिंदखेडराजा महसूल मंडळाचाच नियम लावून किनगाव राजा मंडळाला मदत मिळावी व त्यामुळे आपण संबंधित कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश काढण्यात यावे जर आपण या अतिवृष्टीची माहिती शासनापर्यंत पोहचवली नाही किंवा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश दिले नाही तर या सिंदखेडराजा मंडळातील व किनगाव राजा मंडळातील शेतकरी ताबडतोब येत्या तीन दिवसांमध्ये सर्व शेतकरी धरणे आंदोलन करणार आहे,

Farmer :तरी आपण योग्य ती काळजी घेऊन या अतिवृष्टी पावसा संदर्भात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन पुढील कारवाई करण्यात यावी करिता आपणास निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधले यावेळी शेतकरी मित्र दिलीप भाऊ चौधरी शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक बालाजी सोसे व शेतकरी गोविंदराव टेके, जनार्दन मुंडे , विशाल मुंडे, उद्धव मुंडे, नरसिंग सोसे ,दत्तात्रय झोरे, दत्तात्रय बोडके ,देवानंद सोसे, गणेश मुंडे ,जगदीश मुंडे, संदीप राऊत, आसन शेख अणि या ठिकाणी असंख्य शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here