प्रचंड शक्ती प्रदर्शन” करत नागवंशी संघपाल पनाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल( Vidhansabha)

0
3

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Vidhansabha:सर्वप्रथम संत गजानन महाराज, पंचपिर दर्गा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्थळांना वंदन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात करण्यात आली.

मेहकर लोणार मतदार संघातून प्रचंड मायबाप जनता उपस्थित झाली होती.यावेळी सर्व समजाचे, धर्माचे, पंथाचे, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकच जयघोष करत गर्जना केली एकच वादा नागवंशी संघपाल दादा संघपाल दादा म्हणजेच मेहकर मतदार संघाचा विकास अशा घोषणेने संपूर्ण मेहकर शहर दणाणून सोडले,यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपले मत मांडले.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

त्यामध्ये युवा नेते अनित्य घेवंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की नागवंशी संघपाल पनाड यांना घराघरात पोहोचण्याची जबाबदारी आपली आहे.

आपणच आपला विकास करण्यासाठी या उमेदवारांना उभे केले आहे त्यासाठी सर्वांना आपल्या उमेदवाराचे नाव चिन्ह आणि पक्ष हे कसे घराघरात पोहोचेल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, येणारा काळ हा आपलाच आहे परंतु आपल्यावर आरोप प्रत्यारोप आरोप होतील, त्याला कुठेही बळी न पडता सर्वांनी नागवंशी संघपाल पनाड यांना ना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

उपस्थितामध्ये तोफीक अली, अख्तर भाई, शाकीर भाई पठाण, बळीभाऊ मोरे,फेरोज गवळी,संतोष भाऊ शिंदे संतोष,सद्दाम भाई,पाटील, गणेश भानापुरे शाकीरभाई पठाण दीपक भाऊ आंभोरे ,महेंद्र मोरे, नागसेन पनाड, महेंद्र पनाड, निळकंठ गवई, रमेश पवार,प्रदिप सानप, अनिल पवार,अनिल आनंदराव,शुध्दोधन सरदार, बिंबीसार पनाड, प्रसेंजीत पनाड,संजय शेजुळ,महेश मोरे, सागर पनाड, विशाल

पनाड,राजहंस जावळे, संदेश पनाड, दादाराव पनाड ,राहुल साळवे,रंजीत मोरे विलास खरात, बाळु मोरे, तुळशीराम पनाड, वंशीळाबाई पनाड, सुमनबाई पनाड,सिंधुबाबाई पनाड,हरनाबाई चव्हाण,पाडमुख बाई,नंदाबाई पनाड, कमलबाई पनाड,विजय माला गवई, रूक्मिणीबाई पनाड,केसरबाई गवई,सर्व मायबाप जनतेचे आभार मानले,की माझ्या एकावर हाकेवर आपण या ठिकाणी उपस्थित झालात.

Vidhansabha:त्याबद्दल मी मनाच्या गाभाऱ्यातून सर्वांना धन्यवाद देतो तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला कुठेही तडा न जाऊ देता, मी मतदार संघाचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय मी थांबणार नाही अशी भावना व्यक्त केली.यावेळी महिला पुरुष कार्यकर्ते सर्व समाजाचे नेतेमंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here