Vidhansabha:-संग्रामपूर (सूर्या मराठी न्यूज ब्युरो )ः- निवडणूक उमेदवारी दाखल करण्याची धूम आणि दिवाळीची लगबग व धामधूम अश्या या धामधुमीत शेतकरी शेतमजुरांसाठी संघर्ष करणारा रांगडा गडी म्हणजे स्वाभिमानी चे (राजीव शेट्टी समर्थित) युवा नेता प्रशांत डिक्कर यांनी सजवलेल्या बैलांसह बैलगाडीत उभे राहून भव्य प्रचार रॅली काढून आज दि .२८/ ऑक्टोबर रोजी जळगाव (जामोद) विधानसभे करीता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शेतकरी शेतमजुरांचा धगधगता निखारा म्हणून गेल्या १६ वर्षापासून रस्त्यावर संघर्ष करणारा एका खेड्यातील शेतमजुराचा पोरगं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पुढे आलं अन् युवा नेता बनलं. गावगाडा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, दडपशाही विरुद्ध लोकशाही, कष्टकऱ्यांचा आवाज उठवणाऱ्या व गोरगरीब सामान्य जनतेला हक्काचा न्याय मिळावा.
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
ह्या उद्देशाने काम करणारा व यापुढेही त्यांना न्याय मिळावा. ह्याकरीता लोक वर्गणीतून पुन्हा यावर्षीच्या विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरला आहे.
आणि आज दि.२८/ आॕक्टोबर रोजी जळगाव (जामोद) शहरात सजवलेल्या बैलगाडीत उभे राहून हजारांच्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकरी, शेतमजुरांसह भव्य रॅली काढून विधानसभेसाठी जळगाव (जामोद) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Vidhansabha:-त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात आणि हा जड जाणार असे धनशक्ती असणाऱ्यांना वाटत आसल्याची चर्चा सुरु आहे,