रावेर मतदार संघाला प्रगत, समृद्ध आणि सुफलाम बनवण्याचा माझा संकल्प” : अमोल जावळे(vidhansabha)

0
4

 

यावल-फैजपूरच्या रॅलीला लाडक्या बहिणी आणि तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

vidhansabha:रावेर यावल मतदारसंघातील प्रचार दौऱ्याला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाने विजयाची खात्री असल्याची भावना अमोल जावळे यांनी यावल आणि फैजपूर येथील रॅलीत व्यक्त केली. “घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींचे औक्षण आणि तरुणांनी दिलेल्या स्वागताने मला अनमोल प्रेम दिले आहे. हे प्रेम आयुष्यभर विसरणे अशक्य आहे,”

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

असे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या ११-१३ दिवसांच्या प्रचार दौऱ्यात ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, आणि महिलांनी केलेले प्रेम आणि स्वागत अविस्मरणीय असल्याचे नमूद करत, “पद-प्रतिष्ठा येत-जात राहील, पण हे प्रेम चिरकाल टिकणारे आहे,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.

अमोल जावळे यांनी मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करण्याचे वचन दिले. “रावेर आणि यावल मतदारसंघ सुजलाम-सुफलाम होण्याच्या दिशेने काम करण्याची माझी बांधिलकी आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी सर्वसामान्यांच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावल आणि फैजपूर येथील रॅलीत महिलांनी औक्षण करून आणि तरुणांनी फुलांचा वर्षाव करत अमोल जावळे यांचे जंगी स्वागत केले. या उत्साहवर्धक रॅलीत समाजातील सर्वच घटकांचा सहभाग दिसून आला. प्रचंड संख्येने उपस्थिती असलेल्या रॅलीने रावेर मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला एक वेगळेच बळ मिळवून दिले.

vidhansabha:या रॅलीत हिरालाल चौधरी, हर्षल पाटील, उमेश पाटील, सविता भालेराव, डॉ. कुंदन फेगडे, जयश्री चौधरी, पुरुजीत चौधरी, सागर कोळी, योगराज बऱ्हाटे, श्याम महाजन, भरत पाटील, राकेश फेगडे, नितीन राणे, पिंटू राणे, पिंटू तेली, विलास चौधरी, रामा होले, सिद्धार्थ वाघुळदे, मिलिंद वायकोळे, सागर गाजरे, भूषण चौधरी, श्याम भंगाळे, संजय महाजन, मीनल जावळे, मोहन जावळे, नारायण चौधरी, रितेश पिंपळे, समाधान महाजन, राजू काठोके, विष्णू पारधे, राहुल बारी, उज्वल कानडे, पराग सराफ, महायुतीचे बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here