Gadchirolinews:चामोर्शी:-पंचायत समिती मोर्शीच्या वतीने तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन दिनांक 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत जयनगर विक्रमपूर यांच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व धडाडीचे आमदार डॉ मिलिंद नरोटे हे होते तर अध्यक्षस्थानी पंचायत समिती चामोर्शीचे संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील हे होते.
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
विशेष अतिथी गावचे सरपंच प्रभाष सरकार,प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुर्णे,गावचे उपसरपंच प्रतिमा सरकार, विक्रमपूर गावचे सरपंच विष्णू ढाली,केंद्र प्रमुख मानिक वरपडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुखदेव मंडल,जयनगर शाळेचे अध्यक्ष समिर विश्वास, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश कोत्तावार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष भांडेकर,तालुक्यातील सर्व केंद्रप्रमु, गट साधन केंद्र केंद्राचे गटसमन्वयक चांगदेव सोरते उपस्थित होते.
Gadchirolinews:क्रीडा संमेलनात तालुक्यातील चौदा केंद्रातील सहयोगी विद्यार्थी व शिक्षक-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश साखरे व प्रदिप भुरसे यांनी केले तर आभार केंद्र प्रमुख मानिक वरपडे यांनी व्यक्त केले.