राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने चामोर्शी येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धि तालुका स्तरीय प्रशिक्षण.

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली.
यांच्या विद्यमाने गट साधन केंद्र चामोर्शी येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक क्षमता वृद्धि तालुका स्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक १२ मार्च ते १४ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

आज दिनांक १२ मार्च २०२४ ला प्रशिक्षणाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष प्रा डॉ विठ्ठल चौथाले हे होते तर उद्घाटक म्हणून गटसमन्वयक चांगदेव सोरते हे होते,प्रमुख अतिथी संजय कुनघाडकर, हेमंत पेटकर,श्री शिवराम मोंगरकर,प्रा राकेश इनकणे, प्रमोद भांडारकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रविण पेटकर यांनी केले.

प्रशिक्षणाचे सुलभक चांगदेव सोरते,हेमंत पेटकर,संजय कुनघाडकर,डॉ विठ्ठल चौथाले,प्रा राकेश इनकणे,शिवराम मोंगरकर,प्रमोद भांडारकर हे होते.

शिवमंगल फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा.( women,s day )

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० चे वैशिष्ट्यै(श्री चांगदेव सोरते) यांनी घेतले,राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-२०२० शालेय शिक्षण(श्री हेमंत पेटकर) यांनी ही तासिका घेतली.आंतरसमवाय क्षेत्रे(श्री संजय कुनघाडकर) यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनया बाबत (डॉ विठ्ठल चौथाले यांनी मार्गदर्शन केले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक क्षमता वृद्धि तालुका स्तरीय प्रशिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राज्यात विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे.सदर धोरणामध्ये अपेक्षित केल्याप्रमाणे प्रत्येक घटकाची धोरणानुसार प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने समग्र सक्षमीकरण होणे आवश्यक आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 ची ओळख,राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण,कृतीसंशोधन व नवोपक्रम,नवनवीन अध्यापन पद्धती,माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,विविध सर्वेक्षणांच्या माध्यमांतून दृष्टीक्षेपात आलेली संपादणूक स्थिती,अध्ययन-अध्यापनात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय,शंका समाधान इत्यादी विषयांवर सलभकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.शिक्षक सक्षमीकरणासाठी सदर प्रशिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व असून नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांना सक्षम होणे आवश्यक आहे.सोबतच राष्ट्र आव्हाणांचे रूपांतर संधीमध्ये करण्यासाठी आणि सक्षम नागरिक घडविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० समजून घेणे गरजेचे आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पहिल्या दिवसाचे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील सर्व उपस्थित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी उत्तम सहकार्य केले.

तर तालुका प्रशिक्षण समन्वयक विवेक केमेकर यांनी योग्य व्यवस्थापन केले तर विशेष शिक्षक रवी खेवले यांनी उत्तम सहकार्य केले.

Leave a Comment