Soonu Sood wife accdent :नागपूर – बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद यांचा सोमवारी रात्री नागपुरजवळ गंभीर रस्ता अपघात झाला. मुंबई-नागपूर महामार्गावर सोनगाव पोलीस स्टेशनजवळ त्यांची कार एका ट्रकला धडकली.
सोनाली सूद यांच्यासोबत त्यांची बहीण आणि भाचा देखील कारमध्ये होते.
Talathinews/ ग्रामस्थांची अडचण: वानखेड भाग 2 साठी कायमस्वरूपी तलाठी हवा
अपघातानंतर सोनाली सूद आणि त्यांच्या नातेवाइकांना तात्काळ नागपुरच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुदैवाने, कारमधील एअरबॅग्स उघडल्यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापत टाळता आली. सध्या सोनाली सूद यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, परंतु सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
Soonu Sood wife accdent:सोनू सूद यांच्या कुटुंबीयांनी या अपघाताची पुष्टी केली असून काही छायाचित्रेही सामायिक केली आहेत. अधिक तपशील अद्याप उपलब्ध नाहीत