प्रतिनिधी सचिन वाघे
Mahsulnews:समुद्रपूर:- समुद्रपूर तालुक्यातील चिखली (उमरी) येथील कुक्कुटपालनाची परवानगी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी ठाणेदार, तहसीलदार यांनी तात्काळ आंदोलन स्थळी येऊन भेट दिली.
समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली अतर्गत मौजा उमरी येथे कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) असून प्रोडक्शन सुद्धा सुरु आहे. या कुकुटपालन शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहेत. परिणामी गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहे. गावातील लहान मुले, वृद्ध व अन्य दुर्गंधी पसरल्याने आजारी पडत आहे.
उमरी येथील प्रदीप मिलमिले यांच्या सहा वर्षीय मुलगा यामुळेच आजारी पडला आहे. दुर्गधी मुळे त्याला श्वास घेणे कठीण झाले. त्यांची रक्त तपासणी केली असता त्यात दोष आढळून आलेत. आजार बळावल्याने या सहा वर्षीय मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कुकुटपालनाच्या दुर्गंधी मुळे आजूबाजूचे असलेले शेतकरी शेती सुद्धा करू शकत नाही आहे. यामुळे शेतकर्यांचा उदरनिर्वाचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होत आहे. त्यामुळे कुकुटपालनाची तातडीने परवानगी रद्द करण्यात यावी. याकरिता दिनांक ११ मार्च २०२५ ला तहसीलदार यांना निवेदन दिले. यानिवेदनाची प्रशासनाने दखल सुद्धा घेतली नाही किवां गावात जाऊन सुद्धा बघितलं नाही, यानंतर २ एप्रिल २०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.कुकुटपालन शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
यानंतर कुकुटपालनामुळे गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील? यानंतर सुद्धा कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प) व गावातील नागरिक मिळून आक्रमक भूमिका घेऊ यानंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील असे निवेदन देण्यात आले होते.
आठ दिवसात उपविभागीय अधिकारी यांनी अहवाल सादर करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.तेव्हा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले व आठ दिवसात कारवाई करून कुकुटपालनाची परवानगी रद्द न केल्यास आक्रमक भूमिका घेऊ असे अतुल वांदिले यांनी सांगितले.
Mahsulnews :-यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, शहराध्यक्ष मधुकर कामडी, जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे,दशरथ ठाकरे, दिव्यांग सेलचे प्रदेश संघटक मारोती महाकाळकर,हिंगणघाट शहराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, अमोल बोरकर,गणेश वैरागडे,माजी नगरसेवक राजू भाईमारे, सुनील भुते, श्रीकांत भगत,सुभाष चौधरी, महादेव वांदिले, सुधाकर वाढई,युवक तालुका अध्यक्ष तुषार थूटे, ईश्वर पोफळे (तंटामुक्ती अध्यक्ष), विठ्ठल नन्नावरे(उपसरपंच), अनिल भगत (शिवणी उपसरपंच), हरिभाऊ ढगे वासी उपसरपंच,उमाकांत पोफळे, विजय सालवटकर ग्रा.स, रंजना कानमोडे ग्रा.स, मेघा कुमरे ग्रा.स, सविता उईके ग्रा.स, किशोर डुकरे, प्रभाकर मिलमिले, खुशाल ताजन, परमेश्वर पोफळे, गजानन पोफळे, देवा आमने, वसंतराव चौखे, प्रभाकर भरडे, जीवन नारनवरे,पुरुषोत्तम सालवटकर, संदीप सालवटकर, निलेश डुकरे, बंडू डुकरे, कवडू बावणे, अक्षय चाफले, विजय मुके, वाल्मीक तपासे, डोमा शेंडे, रवींद्र नखाते, गुलाब भगत,अतुल चौधरी, अमोल मुडे, सुनील घोडखादे,गोकुळ टिपले, पंकज भट्ट,रोशन थुटे, सोहम शेंडे, आकाश हुरले, कुणाल गोल्हर यांच्यासह चिखली (उमरी) गावातील शेकडो नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.