कु.पाखी अतुल वांदिले हिच्या पाचव्या वाढदिवसा निमित्य पाच वृक्षाची लागवड..(atulvandile)

0
200

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कन्या पाखी वांदिले हिच्या वाढदिवसाच्या निमित्य श्री.साई मंदिर समोरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण आणि मानवी जीवन यांच्यातील नातेसंबंधांबद्दल बोलायचे तर ते एक अतूट नाते आहे, ज्यात निसर्गाने मानवाला सर्व काही दिले आहे. मात्र, निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीच्या नावाखाली ना त्याचे नीट संरक्षण केले आणि ना भविष्याची चिंता.

Policenews / चोरी गेलेली मोटारसायकल सोनाळा पोलिसांनी केली मूळ मालकास परत; गाडी मालकाने मानले पोलिसांचे आभार .

त्याचाच परिणाम म्हणून आज जग प्रदूषित पर्यावरण आणि नैसर्गिक आपत्तींच्या कोपाखाली गाडले जात आहे. गत काही वर्षांत पर्यावरणाची गंभीरपणे बिघडत चाललेले आहे. म्हणूनच उष्माघाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे,

आपल्याला पर्यावरणाला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या शुभमंगल प्रसंगी प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक वृक्ष लावण्याची गरज आहे असे मनोगत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.

atulvandile:या कार्यक्रमाला श्री.साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर महाराज, अतुल वांदिले, नामदेव वांदिले, विनोद कुबडे, दशरथ ठाकरे, बालु वानखेडे, माजी नगरसेवक दादा देशकरी, अमोल बोरकर,स्वाती वांदिले, अमिता जुमडे,माधुरी कावरे, राणी सोमवंशी, वैशाली हेडाऊ,जयश्री कुबडे, प्रवीण कावरे, आनंद जुमडे, नितीन भुते, बच्चू कलोडे,सुनिल भुते, प्रवीण भुते,राजू सिंन्हा,सुशील घोडे, राहुल जाधव, राजू मुडे, कुणाल घोल्हर,प्रशांत कुटे,सतिश झीलपे, दिनेश राऊत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here