Ajitpawar / शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा?

0
662

 

 

Ajitpawar:राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं पुन्हा मोठं विधान; म्हणाले.

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.

Ravikanttupkar / संघटना निर्दालनाच्या नावाखाली सरकारची कारवाई”- रविकांत तुपकर

या निर्णयाचा शेतकऱ्यांसह त्यांच्या नेत्यांकडून केली जाणारी मागणी आणि त्यावरील सरकारची भूमिका यांच्या संदर्भात हे विधान महत्त्वपूर्ण आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्याचा सरकारचा कधीही विचार नव्हता,असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Ajitpawar / पवारांनी मोठया आवाजात सांगितले,“लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही?

त्यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खतांची उपलब्धता आणि पीककर्ज वाटप यांचा आढावा घेतला. राज्यात बी-बियाण्यांचा पुरेसा साठा आहे, मात्र डीएपी खताची काहीशी टंचाई भासत आहे. त्या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.

Ajitpawar:अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील विविध पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात, ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here