आज सर्किट हाऊस कराड येथे विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आपल्या विचारांवर विश्वास ठेवून पक्षात दाखल झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार अतुल बाबा भोसले यांनी स्वागत केले.
ह्या वेळी आमदार अतुल बाबा भोसले म्हणाले की या कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे कराड तालुक्यातील संघटन अधिक बळकट होईल, याचा मला विश्वास आहे.
यामुळे कराडसह जिल्हाभरातील जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी नवी ताकद आणि नवा आत्मविश्वास मिळणार आहे.
Hingnghatnews/ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट शाळेचा बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा स्तरावर झेप.
मोदीजींच्या नेतृत्वाखाली सशक्त भारत – आत्मनिर्भर भारत या ध्येयाकडे वाटचाल करताना सातारा जिल्हा निश्चितच आघाडीवर राहील.
यावेळी श्री. प्रदीप भोसले, श्री. अनिल वडार, श्री. अनिल चौगुले, श्री. संतोष पवार श्री. राहुल वाडकर, श्री. भास्कर वाडकर, श्री. चांद मुल्ला, श्री. रोहित सकटे, श्री. विनोद वरनारायण, श्री. समीर सय्यद, श्री. सचिन वल्लाळ, श्री. विक्रम वरनारायण, श्री. सागर मोहिते, श्री. अब्दुल मुल्ला श्री. मोहसीन जमादार, श्री. आकाश पवार यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
हेमंत पाटील
सूर्या मराठी न्यूज साठी
कराड