प्रतिनिधी सचिन वाघे
समुद्रपूर, ता. २५ सप्टेंबर: समुद्रपूर तालुक्यातील डोंगरगाव येथील पुनर्वसन झालेल्या गावात मूलभूत सुविधांचा अभाव असून, स्थानिक नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. वीज, रस्ते, नाली व पिण्याच्या पाण्याची कमतरता असून, नागरिकांना आपल्या हक्कांसाठी अजूनही कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
डोंगरगाव हे गाव नदीलगत असल्यामुळे वारंवार पूरस्थितीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण गावाचे पुनर्वसन केले, मात्र नवीन पुनर्वसन स्थळी अद्याप आवश्यक सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.sharadpawar
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी डोंगरगावला भेट देऊन गावाची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या, त्यावर अतुल वांदिले यांनी तात्काळ संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून गावच्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिले. Sharadpawar
Atulvandileया वेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, प्रशांत गहुकर, सरपंच संजय वरघणे, संजय कारवटकर, खुशाल लोहकरे, नंदकिशोर धोटे, गजानन गिरडे, उमेश चंदनखेडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.








