Umrganews /स्ट्रीट लाईट सुरू करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आ. प्रवीण स्वामी यांचे आंदोलन मागे

0
177

 

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा : उमरगा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर तलमोड दस्तापूर दरम्यानच्या स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता तलमोड जवळील टोल बंद करण्यात इशारा आ. प्रवीण स्वामी यांनी दिला होता. मात्र सात दिवसात ह्या स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्याचे आश्वासन संबंधित विभागाने दिले आहे.dharashivnews

राष्ट्रीय महामार्गावर तुरोरी, जकेकुर चौरस्ता, येळी, दाळिंब,
मुरूम मोड, या ब्रिजवर गेल्या अनेक महिन्यापासून स्ट्रीट लाईट बंद होत्या. त्यामुळे वाहनधारकांची मोठा सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यासाठी संबंधित विभागास तीन वेळेस लेखीपत्र दिले होते.

Umrganews /मात्र या स्ट्रीट लाईट दुरुस्त केल्या जात नसल्याने आ. प्रवीण स्वामी यांनी १७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावरील हा टोल बंद करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला होता. या
मार्गावर मोठी वर्दळ असते आणि अनेक भागात लुटीचे प्रमाण वाढले आहे.

Dharashivnews त्यामुळे प्रवासी भयभीत झाले असताना राष्ट्रीय महामागार्ची अधिकारी याकडे जाणून मधून दुर्लक्ष करत होते. मात्र आमदार स्वामी यांनी टोलबंदच्या या तंबीनंतर येत्या सात दिवसात ह्या ट्रीट लाईट सुरू करण्याची लेखी आश्वासन दि. १७ डिसेंबर रोजी आ.प्रवीण स्वामी यांना दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here