Farmernews /अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकाचे नुकसानीचे पंचनामे करुन शेतक-यांना तात्काळ मदत दया 

0
6

 

शिवसेना किसान सेनेचे तहसीलदारांना निवेदन.

अनिलसिंग चव्हाण

संग्रामपुर/ तालुक्यात २७ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे गहु, मका, हरभरा, संत्रा, कांदा ,तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेती पिकाचे ज्या गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले त्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा या मागणीची निवेदन शिवसेना किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख‌ अमोल पाटील ठाकरे व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ३फेब्रुवारी रोजी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपुर तालुक्यात २७जानेवारी रोजी अवकाळी पाउस व गारपीटीने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यामधे गहु, मका, हरबरा, संत्रा, कांदा तसेच इतर पिकांचा समावेश आहे. महसुल विभागाकडुन मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील अंदाजीत २४गावे बाधीत असुन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त बाधीत गावांमध्ये धामणगांव,वसाळी, हडीयामहल, तामगांव,सावळा, मारोड, सायखेड, अकोली. बु., अकोली खु. राजपुर, मालठाणा बु., मालठाणा खु., गोपाळखेड, झाशी, निमखेड, पळशी, करमोडा, शिवणी, लोहगाव बु., लोहगाव खु., शेवगा खु., शेवगा बु., लाडणापुर भाग-1, चिचारी असे २४ गावातील १५८६.७ हेक्टर क्षेत्रातील पिकांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी अन्यथा तात्काळ मदत न मिळाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.

Farmernews /असा इशारा या निवेदनातून देण्यात आलेला आहे. या निवेदनावर अमोल ठाकरे, कैलास कडाळे विधानसभा संघटक, मोहन ठाकरे किसान सेना.ता. प्रमुख, ज्ञानेश्वर गोतमारे तालुका उपप्रमुख, संजय खोंड तालुका उपप्रमुख, सुनील मुकुंद, जितेंद्र तायडे, नंदू पाटील खानजोड, सैय्यद रेहान सय्यद भिकन,रवींद्र घोडसे, गजानन गोतमारे, विनायक गोतमारे गणेश डाखोडे आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here