HSCNews/आईच्या जिद्दीने घडवली गुणवंत कन्या; समीक्षा जणबंधूचे सर्वत्र कौतुक

0
1

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट/वर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी 2026 च्या उच्च माध्यमिक (HSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून वर्धा जिल्ह्यातील महेश ज्ञानपीठची विद्यार्थिनी समीक्षा भाग्यश्री विनोद जणबंधू हिने वाणिज्य शाखेत 560 गुण मिळवत 93.33 टक्के गुणांसह उज्ज्वल यश संपादन केले आहे.bordnews

समीक्षाने सर्व विषयांत उल्लेखनीय गुणवत्ता दर्शवित इंग्रजी विषयात 89 गुण, अर्थशास्त्रात 94 गुण, बुक कीपिंग व अकाउंटन्सीमध्ये 95 गुण, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये 87 गुण, गणित व सांख्यिकीमध्ये 96 गुण, तसेच माहिती तंत्रज्ञान विषयात तब्बल 99 गुण मिळवले. तिच्या या सर्वांगीण यशामुळे शाळेच्या गुणवत्तेची परंपरा अधिक बळकट झाली आहे.

या यशाबद्दल भावना व्यक्त करताना समीक्षा म्हणाली, “माझ्या आईच्या अथक परिश्रमांमुळे आणि शाळेतील शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच मला हे यश मिळाले. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी आत्मविश्वासाने अभ्यास करून हे यश संपादन करू शकले.”

समीक्षाच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबात, शाळेत तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, नातेवाईक आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.HSCNews

HSCNews/महेश ज्ञानपीठसाठीही ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली असून समीक्षा जणबंधूच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here