Home वर्धा Policenews/वाळू प्रकरणाशी सुमित भुते यांचा संबंध नाही; निलंबनाची कारवाई स्वतंत्र दारू प्रकरणात

Policenews/वाळू प्रकरणाशी सुमित भुते यांचा संबंध नाही; निलंबनाची कारवाई स्वतंत्र दारू प्रकरणात

 

प्रतिनिधी सचिन वाघे

समुद्रपूर : समुद्रपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर वाळूचे वाहन सोडण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या आरोपासंदर्भात यापूर्वी विविध माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या उपलब्ध वृत्ताच्या आधारे पुढील वृत्तांकन करताना सुमित भुते यांचे नाव संबंधित प्रकरणाशी जोडले गेले होते.PoliceNews

मात्र, या संदर्भात अधिक माहिती उपलब्ध झाल्यानंतर सुमित भुते यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई वाळूचे वाहन सोडण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या प्रकरणाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई ही दारूशी संबंधित स्वतंत्र प्रकरणातील असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे वाळूचे वाहन सोडण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या प्रकरणातील कारवाई आणि सुमित भुते यांच्यावरील निलंबनाची कारवाई या दोन स्वतंत्र बाबी आहेत. सुमित भुते यांचा वाळू प्रकरणातील कथित लाचप्रकरणाशी संबंध असल्याचे दर्शविण्याचा कोणताही हेतू नव्हता.

यापूर्वीचे वृत्त त्यावेळी उपलब्ध असलेल्या वृत्तमाहितीच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये सुमित भुते यांचे नाव वाळू प्रकरणाशी जोडले गेल्यामुळे त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.

Wardhanews/त्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट करून संबंधित व्यक्तीची प्रतिमा व प्रतिष्ठेला अनावश्यक धक्का पोहोचू नये, या उद्देशाने हे स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात येत आहे.