गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ मन नदित बुडून मरण पावल्याची दुर्देवी घटना

0
645

 

 

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या आमले बंधूचा मन नदीत बुडून मृत्यू

गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ शेगाव तालुक्यातील नागझरी जवळील मन नदीच्या पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी घडली आहे. अकोला येथील अनंत नगर येथील कल्पेश संजय आमले वय 26 व रूपेश संजय आमले वय 25 असे मृतकांची नावे आहेत.

अकोला येथील बाळापूर नाका जवळील कल्पेश संजय आमले वय 26 व रूपेश संजय आमले वय 25 असे मृतकांची नावे आहेत. दोन्ही भाऊ घरच्या गणपतीचे विसर्जनासाठी मन नदी वर आले. अचानक दोघेही बुडाल्याने एकच खळबळ उडाली. नदी वर असलेल्या अन्य गणेश भक्तांच्या लक्षात येताच धावाधाव झाली.प्रथम रूपेश ला नदी पात्रातून गणेश भक्तांनी पाण्याबाहेर काढले.श्वासोश्वास चालू व्हावा पंपिंग करून पाहिले.मात्र काही उपयोग झाला नाही. अखेर रूपेशची प्राणज्योत मालवली.त्यानंतर कल्पेशची शोधाशोध सुरू केली.सायंकाळी 6 वाजेदरम्यान कल्पेशचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. घटनास्थळी उरळ ता.बाळापूर तसेच शेगाव शहर पोलीस स्टेशन चे अधिकारी नितिन इंगोले व स्टाफ हजर होते. पंचनामा करून शवविच्छेदन साठी मृतदेह पाठविण्यात आले. गणेश विसर्जनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळेआमले अकोला येथील अंनत नगरात एकच शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here