संग्रामपुर तालुक्यातील रिक्त पदे कायम स्वरूपी भरण्यात यावी याकरिता उपोषणाचा प्रशासनाला इशारा

 

 

 

याकरिता उपोषणाचा प्रशासनाला इशारा दिला होता. त्या अनुषंगाने प्रशासनाने अगोदर फोनवरून तोंडी आश्वासन दिले होते पंरतु तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून ते आश्वासन प्रशासनाकडून लेखी स्वरूपात सुध्दा घ्यावा असे ठरवले व त्या मागणीसाठी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला. तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी, ही पदे लवकरात लवकर कायमस्वरूपी भरुन देण्याचे मान्य केले. तहसीलदार व तहसील कार्यालयातील रिक्त पदे सुध्दा शासनाकडे पाठपुरावा भरण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावरून प्रयत्न करु हे सुद्धा आश्वासन दिले. कोविड 19 चा वाढता प्रभाव पाहता आज प्रशासनाने मागितलेला वेळ देण्याचे ठरवले. या मागण्या प्रशासनाने दिलेल्या वेळेत पूर्ण नाही केल्या तर संग्रामपुर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्रिव आंदोलन करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा वजा चेतावणी आंदोलकांच्या वतीने देण्यात आली. यावेळी उपोषणाला बसु नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने पं स चे श्री. उंद्रे साहेब, हे मेल ने आलेल्या पञासह उपस्थित
होते यावेळी प्रभारी तहसीलदार श्री चव्हाण साहेब उपस्थित होते. याप्रसंगी उपोषण कर्ते श्री. लोकेश राठी सह भा ज पा जिल्हा उपाध्यक्ष श्री. जानरावजी देशमुख, ता अध्यक्ष डॉ श्री गणेशभाऊ दातिर, जेष्ठ नेते श्री. पांडुरंगजी हागे, रमेशभाऊ चोपडे, ता सरचिटणीस श्री सुधाकरभाऊ शेजोळे, राजुभाऊ मुयांडे, संग्रामपुर शहराध्यक्ष श्री. विलास इंगळे, रामदासभाऊ गांवडे, उध्दवभाऊ व्यवहारे, गजानन ठाकरे, अविनाश धर्माळ, गुणवंत खोडके, दुर्गादैत्य सरपंच पाठक यासह मोठ्या संख्येने भा ज पा कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Comment