Home Breaking News सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात...

सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. पिकांचे नुकसान भरपाई शासनाने त्वरीत द्यावी

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र फडणवीस हे खरीप पिकांचे नुकसान अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यात सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथे आले असता सेलू तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. रवींद्र डासाळकर, भा ज पा किसान मोर्चाचे श्री. दगडोबा जोगदंड पाटील, चंद्रकांत चौधरी, गोविंद मगर, शिवाजी हिंगे, लक्ष्मण जाधव यांनी सेलू तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्ज माफी करावी या मागणीचे निवेदन विरोधी पक्ष नेते यांना देण्यात आले. यावेळी सेलू जिंतूर तालुक्याच्या आमदार सौ. मेघना दिदी बोर्डीकर उपस्थित होत्या.