साकळी येथे शिवसेना युवा सेना तर्फे कोरोना संसर्गाच्या काळात आपले जिव धोक्यात घालुन वृत्त लेखणातुन व आरोग्य जनजागृती करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार यांचा सन्मान व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला  

0
346

 

संपुर्ण जगासह आपल्या देशात कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या संकटकाळात नागरीकांना प्रत्येक दिवसाची माहीती देवुन खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीकोणातुन आपले स्वत:चे जिव धोक्यात घालुन वृत्तसंकलनाच्या माध्यमातुन जनजागृतीचे कार्यकरणाऱ्या पत्रकारांचा, आशा सेविका मदतनीस,आरोग्य कर्मचारी,युवा सेना शिवसेना पक्षाचे आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या युवा सेना शिवसेना पक्षातर्फे सत्कार सोहळा आज साकळी येथे संपन्न झाला.
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या या पत्रकारांच्या व आशा सेविका मदतनीस आरोग्य कर्मचारी सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सौ.लताताई सोनवणे, उपजिल्हाप्रमुख मुन्ना भाऊ पाटील ,यांच्या हस्ते हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पूजन करून कोरोणा योद्ध्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे यावेळी ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे,युवा सेना प्रमुख प्रवीण सोनवणे, उपप्रमुख विनायक आप्पा पाटील, स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष भरत चौधरी , प्रदीप वानखेडे ,दीपक कोळी ,सुधाकर धनगर , प्रकाश चौधरी, आशिष झुरकाळे, त्याच बरोबर सूत्रसंचालन डॉक्टर सागर पाटील, व युवा सेना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here