न्हावी येथे एका आदीवासी शेतमजुराची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या पोलीसात अक्समात घटनेची नोंद . .

0
403

 

, यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

, तालुक्यातील न्हावी येथे शेतातील विहीरीत उडी घेवुन एका आदीवासी शेतमजुराची. आत्मह्त्या पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . दरम्यान फैजपुर पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार न्हावी तालुका यावल येथील प्रगतीशील शेतकरी टेनु डोंगर बोरोले यांच्या न्हावी शिवारातील शेतात काल दिनांक १५ मार्च रोजी रात्री ११, ३० वाजेच्या सुमारास त्याच शेतात कामास असलेले प्यारसिंग रेमसिंग बारेला वय४५ वर्ष राहणार माळीवाडा न्हावी यांनी शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . प्यारसिंग बारेला याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी केले असुन ,या संदर्भात फैजपुर पोलीस स्टेशनला अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत असुन मयतास पत्नी , दोन विवाहीत मुली आणी एक मुलगा आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here