accident news /या भीषण अपघातात तीन महिला ठार, तर 22 जण गंभीर जखमी..

 

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात या भीषण अपघाताची घटना समोर आली.असून ट्रक,जीप आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत.
तर या दुर्घटनेत 22 जण गंभीर जखमी झाले आहे. हे घटना मोठी असून या घटना 22जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी दुपारी विचखेडा फाट्याजवळ घडली.

याबाबत असे वृत्त आहे की, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बोळे येथून चिलाणे ता.शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कारसाठी प्रवाशी वाहतूक करणारे वाहन क्रमांक (एमएच-१८ एम ५५५४) हे २२ जणांना घेऊन जात होते. आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर क्रमांक (जीजे १२ बीडब्ल्यू ७२५४) चा ताबा सुटल्याने भरधाव वेगाने वाहने पिकअप वाहनाला आमोरासमोर जोरदार धडक दिली.accident news

या भीषण आपघातात रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) , चंदनबाई गिरासे (वय ६५) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकूण २१ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच बोळे परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघात स्थळी तसेच कुटीर रुग्णालय या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Crimenews भटकंती करणाऱ्या पीडितेवर अज्ञाताच्या कुकृत्यामुळे निघाली पीडिता सात महिन्यांची गर्भवती

या अपघाताची माहिती मिळतात जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून बचावकार्याला सुरूवात केली. या दरम्यान, यावेळी रोडवरील दोन्ही बाजूची वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.accident news

Leave a Comment