Akolanews | नवीन वर्षानिमित्त दारू पिऊ नका दूध प्या संकल्प ;शहर पोलीस स्टेशनचा उपक्रम

0
1

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

Akolanews: जाणाऱ्या २०२३ वर्षाला निरोप देऊन नवीन उमेद घेऊन येणाऱ्या २०२४ पासून व्यसन करणाऱ्यांनी नवीन वर्षानिमित्त दारू पिऊ नका दूध प्या संकल्प करून सुखी जीवन जगावे या उद्देशाने ठाणेदार भाऊराव घुगे यांनी आगळावेगळा उपक्रम ३१ डिसेंबरच्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये राबविले.

मावळत्या वर्षाला निरोप देऊन येणारे नवीन वर्षाचा हसत स्वागत कराचे असते पण आपण पाहतो की अलीकडे युवक जास्तीत जास्त व्यसनाधीन होताना दिसतोय नवीन वर्ष साजरा कसे करावे तर दारू पिऊन साजरा करता याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे प्रतिबंध झाला पाहिजे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यास प्रामाणिक भावनेतून मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अभिनव उपक्रम दारू पिऊ नका दूध प्या या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली.

Akolanews :यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे ठाणेदार भाऊराव घुगे,एपीआय अनंतराव वडतकर,उपनिरीक्षक गणेश सर्ववंशी,ज्येष्ठ नगरसेवक विनायक गुल्हाने,भारत जेठवाणी,प्रा.प्रमोद ठाकरे निजाम

इंजिनियर,युनूस खान,छबिले पाटील,मुन्ना नाईकनवरे,संगीत कांबे,सुनील पवार,राजकुमार नाचणे,राम दर्यानी,सुबोध बंग,नुपेन अरोरा व इतर तरुण मंडळी शांतता समिती सदस्य पत्रकार शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here