Buldhana News | गरिबांच्या दुकानांवर बुलडोझर..तर वरली मटक्यांच्या दुकानांना अभय का..?वरली मटक्यावाले शासन प्रशासनाचे जावई आहेत का..?जाहीर करा.ॲड.सतीशचंद्र रोठे.

 

अवैध्य धंदे व बिहार राज बंद करण्यासाठी आझाद हिंदचा अल्टिमेट.

अन्यथा जन आक्रोश मोर्चाचे आयोजन.

बुलढाणा:
अवैध धंद्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तिनं तेरा वाजले आहेत. अवैध व्यवसायिकाकडून हप्ते मिळत असल्यामुळे शासन प्रशासनाकडून वरली मटक्यावाल्यांना व त्यांच्या दुकानांच्या जागेला अभय दिल्या जात आहे.

गरिबांच्या अतिक्रमित हातगाड्या, छोटी दुकाने उठवल्या जात असतांना वरली मटका वाल्यांना शासन प्रशासनाच्या जागेत दुकाने थाटण्याची परवानगी कशी आहे..?

मग ते शासन प्रशासनाचे जावई लागतात का..? हे प्रथम जिल्हा प्रशासनाने जाहीर करावे.अन्यथा आझाद हिंद च्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा आझाद हिंद संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे.

एक जानेवारीला जिल्हाधिकारी बुलढाणा व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे प्राण घातक हल्ले,नाबालिक मुली,महिला गहाळ होणे,अपहरण,अन्याय, अत्याचार ,बलात्काराच्या वाढत्या घटना, रोड राॅबरी, चोरी, दरोडा, दागिने लुटणे, फसवणूक यासह चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याच्या घटनां दैनंदिन घडत आहेत.

crimenews |नाष्टाचे पैसे देण्याच्या कारणावरुन लोखंडी झार्याने मारहाण, उमेश शेगोकार.त्यांच्या सहकार्य.विरुद्ध गुन्हा दाखल

त्यामुळे वाढणारा क्राईम रेट जिल्ह्याची प्रतिमा बिहाराजची झाली आहे.यासाठी मागील तीन वर्षात आझाद हिंद सह जिल्ह्यातील सर्व पक्षीय, सामाजिक संघटनांच्या वतीने सातत्याने विविध आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठविला आहे.

तरी जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणातील मागणीकडे जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. स्वयंकेंद्रित स्वार्थासाठी जिल्हा प्रशासन गरीबांच्या परिवाराची राखरांगोळी होतांना उघड्या डोळ्याने पाहत आहे. तरी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण करावी. अन्यथा आझाद हिंद च्यावतीने जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाअंती देण्यात आला आहे

Buldhana News | गरिबांच्या दुकानांवर बुलडोझर..तर वरली मटक्यांच्या दुकानांना अभय का..?वरली मटक्यावाले शासन प्रशासनाचे जावई आहेत का..?जाहीर करा.ॲड.सतीशचंद्र रोठे. निवेदनावर अँड.सतीशचंद्र रोठे,शेख सईद, संजय एंडोले,असलम शाह, सय्यद युसुफ,आदित्य गवई,शेख शब्बीर, सुरेखाताई निकाळजे, वर्षाताई ताथरकर,आशाताई गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
________________________

Leave a Comment