Akolanews | शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार नुकसानीची मदत

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

Akolanews :मुर्तीजापुर तालुक्यातील मधापुरी या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार नुकसानीची मदत याची प्रतीक्षा करत असताना शेवटी शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या दरबारात निवेदनाच्या माध्यमातून आपली कैफियत मांडावी लागली.

Akolanews: मुर्तीजापुर तालुक्यातील मधापुरी,जेठापूर,हयातपूर येथील सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांना निवेदन सादर केले दिलेले निवेदन नमूद केले आहे.की २०२३ मध्ये जुलै ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाली संपूर्ण शेती खरडून गेली अतोनात नुकसान झाले तरी लाभ मिळाला नाही.

शासनाने मंजूर केलेले पीक विकण्याची २५% अग्रीम मदत सुद्धा मिळाली नाही.२०२२ मध्ये जाहीर झालेली मदत आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

२०२३ जुलै ते ऑगस्ट या दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे व जमिनीचे अतोनात नुकसान झाले परंतु चुकीच्या सर्वामुळे जे संबंधित गरजू लाभार्थी आहे.हेतूपुरस्कर वगळता आले असून त्याची चौकशी करण्यात यावी पिक विमा मंजूर झालेले शासनाचे २५% अग्रीम रक्कम अजून पर्यंत विमा काढलेले शेतकऱ्यांना मिळाले नाही.

Ravikanttupkar | १९ जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन! राजधानी व गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या रोखणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा

 

 

याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे विमा कंपनीचे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावे २०२२ मध्ये अतिवृष्टी सरसकट शेतकऱ्यांना शासनाने मदत घोषित केलेली होती.

परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अजून पर्यंत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही.यादीमध्ये नाव असूनही विशिष्ट क्रमांक वीके अजून पर्यंत आलेला नाही.संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना देऊन याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी समस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Akolanews : तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याशी शेतकरी अमर ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली शिल्पा बोबडे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी शेतकरी अमर ठाकरे,चंद्रकांत उमक,अमोल पवार, सतीश मालधुरे,गजानन पवार,शंकरराव खरबडे,अश्विन आमटे,देवानंद मेरे,शिवाजी मेहरे, संजय बनाईत,चंद्रकांत गणोरकर,पांडुरंग डहाके,विनोद इंगळे,नरेंद्र दहीकर,कमल आमले व इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

Leave a Comment