उपचारा दरम्यान ४६ वर्षीय व्यक्ती चा अकोला रूग्णालयात मृत्यू

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव छातीत वेदना होत असल्याने उपचारासाठी अकोला येथील ओझोन रूग्णालयात शेगांव येथील जयंत बळीराम वानखडे या ४६ वर्षीय व्यक्ती चा मृत्यु झाल्याची घटना दि.२१/११/२०२३ संध्याकाळी ७.१५ दरम्यान घघडली.

हकीकत अशी की, स्थानिक इंदिरा गांधी न.प. हायस्कूल येथे कार्यरत शिक्षक जयवंत बळीराम वानखड़े वय ४६ वर्ष रा. रोकडीया नगर हे दि. २१/११/२०२३ रोजी सायंकाळी ५.१५ वा आझोन हास्पीटल ,अकोला मध्ये भरती झाले होते. त्यांचेवर दि.१९/११/२०२३ ला पाइल्स आजारावर कोरपे हॉस्पीटल ,अकोला येथे शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांचे छाातीत वेदना होत असल्याने त्यांना ओझोन हॉस्पीटल,अकोला येथे संध्याकाळी भरती केले होते

.भरती केल्या नंतर मयत हे चालत असता खाली पडले व बेशुध्द झाले उपचारा दरम्यान संध्याकाळी दि.२१/११/२०२३ ला ७.१५ वा ते मरण पावले याप्रकरणी फिर्यादी – डॉ. सुभाषचंद्र कोरपे तर्फे, कक्षसेवक दत्तात्रय भाणुदास ठाकरे ओझोन हॉस्पीटल अकोला यांनी फिर्याद दिली असतात अकोला पो.स्टे.मध्ये ०/२३ कलम १७४ जाफौ नुसार मर्ग दाखल करून शेगांव शहर पो.स्टे.ला हस्तांतरित करण्यात आला .पुढील तपास नापोका रवि इंगळे हे करीत आहेत. Akolapolice

Leave a Comment