अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
bjpnews:मलकापूर ,लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर काल मलकापूर मधील रणगाव आणि शिवनी येथे भाजपा युवा मोर्चा द्वारा आयोजित नमो चौपाल कार्यक्रमाच्या माध्यमातून रावेर लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे ह्यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. ह्या प्रसंगी युवा वॉरियर्स शाखेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
ह्या कार्यक्रमात गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 13 मे 2024 रोजी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून जास्तीत जास्त मतदान महायुतीच्या उमेदवाराला करावं असं आवाहन केलं.
आगामी काळात होणार्या लोकसभा निवडणुकांमध्ये युवकांची जबाबदारी आणि संघटन आदरणीय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी ह्यांच्या 400+ व्हिजन वर चर्चा करणे ह्या उद्देशाने ठीक ठिकाणी होणाऱ्या नमो चौपालच्या माध्यमातून युवकांसोबत संवाद साधण्यात येत आहे.
दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )
युवा वर्ग आदरणीय पंतप्रधान मा.नरेंद्र जी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आग्रही आहे.
लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
bjpnews:ह्या प्रसंगी सोबत मा.शुभम दादाराव पाटील, तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मलकापूर, भाजपा युवा मोर्चा मलकापूर शहर तसेच मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते