अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
buldhananews:लोणार (बुलढाणा), बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे या लहानश्या गावातील राजू केंद्रे या तरुणाची जर्मन सरकारच्या संशोधन क्षेत्रातील जगमान्यता प्राप्त आलेक्सांदर हुंबोल्ट फाऊंडेशनद्वारे फेलोशीपसाठी निवड झाली आहे.
भटक्या समाजातील शेतकरी कुटुंबातील राजू केंद्रे याची ही मोठी भरारी जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण राज्याची मान उंचावणारी आहे.
राजू केंद्रे यांनी त्यांच्या एकलव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून मेळघाट येथील आदिवासी मुलांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आदिवासी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. जर्मनीतील ही फेलोशीप त्यांच्या या कार्याला नवे आयाम मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरेल.
buldhananews:राजू केंद्रे यांचे गावकऱ्यांनी सत्कार केले व मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या