हाके व वाघमारे यांना लोणार मधून पाठिंबा ( buldhananews )

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

buldhananews:हाके भाऊ वाघमारे यांच्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनास लोणार मधून पाठिंब्याचे पत्र तहसीलदारा रामप्रसाद डोळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले व ओबीसी बचाव च्या घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडला.

सर्पमित्र शरद जाधव यांना वन्यजीव संरक्षण व सर्ममित्र राष्ट्रीय पुरस्कार ( sharadjadhav )

ओबीसी आरक्षण बचावासाठी गेल्या सात दिवसांपासून वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना पाणी पिणे व उपचार घेण्याची विनंती केली आहे.

या उपोषणाला पाठिंबा देत असताना ओबीसी आरक्षणाला आमचा कोणाचाही विरोध नाही परंतु ओबीसी आरक्षण देत असताना लोकसंख्येनुसार ओबीसी आरक्षण कोटा केंद्र सरकार कडून वाढवुन घ्या व आरक्षण द्या असे निवेदनात म्हटले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

buldhananews:तहसीलदार रामप्रसाद डोळे यांना निवेदन ॲड. शिवाजी सानप, डॉ. गोपाल बशीरे , गजानन जाधव, शहर लुकमान कुरेशी, राजूभाऊ बुधवत, सुदन अंभोरे, किसनराव आघाव बळीराम दराडे सुनील सानप सुनील सांगळे, विनोद डोळे, रामेश्वर आघाव, सुनील आघाव, गणेश पाठे, अजय बच्छिरे यांच्यासह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment