लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर
buldhananews:भारतीय बौद्ध महासभा बुलडाणा जिल्हा अध्यक्ष आदरणीय एन एल खंडारे यांच्या उपस्थितीत आयुनी. सरस्वती ताई साबळे केंद्रीय शिक्षका यांच्या अध्यक्षतेखाली गायखेड येथे जिल्ह्यातील पहिली महिला शाखा स्थापन करण्यात आली.
यावेळी गावातील असंख्य महिलांनी सक्रिय सहभाग दर्शवीला. कार्यक्रमाला प्रा. के बी इंगळे सर, अमित काकडे, साबळे सर जिल्हा पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा, माजी सरपंच आयु. प्रकाश मोरे, आयु. रोहिदास मोरे, भिमराव मोरे, आयुनि. रुखमिनाबाई मोरे, व अनेक मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षा सौ. कमल अभिमान मोरे, सरचिटणीस सौ. मिना जितेंद्र मोरे, कोषाध्यक्षा सौ.वैशाली रामदास मोरे, संस्कार सचीवा सौ. संगीता संजय मोरे, संस्कार उपाध्यक्षा सौ. कल्पना विलास मोरे, संस्कार सचिवा सौ. निर्मला सुरेश मोरे, पर्यटन उपाध्यक्षा सौ. संगीता उर्फ ताई कडूबा मोरे, पर्यटन सचिवा सौ. कविता गजानन अंभोरे, पर्यटन सचिवा शिला
विजय मोरे, संरक्षण उपाध्यक्षा वैशाली नितीन मोरे, संरक्षण सचिवा सौ. पूनम सचिन मोरे, संरक्षण सचिवा सौ. सुनिता कैलास मोरे, हिशोब तपासनीस आयुणि. छाया रोहिदास मोरे, संघटक सौ. ज्योती राजेंद्र मोरे, राधाबाई मदन मोरे, मालता सुरेश मोरे, नंदू ओंकार मोरे, बेबीताई अशोक काकडे, उज्वला रजनीकांत मोरे, अशा प्रकारे महिला शाखा गठित करण्यात आली,
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मण मोरे सरचिटणीस उल्हासनगर तालुका शाखा जिल्हा ठाणे यांनी केले सदर शाखा स्थापन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
Buldhananews :शेवटी आभार प्रदर्शन संतोष साहेबराव मोरे यांनी केले सरणतय घेऊन खिरदान वाटप सौ. निर्मला लक्ष्मण मोरे संघटक व समता सैनिक त्यागमूर्ती रमाई शाखा उल्हासनगर यांनी केले.