नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल मध्ये कार्यशाळा संपन्न.(Buldhananews )

 

जावेद शहा बुलढाणा

दिनांक २०जानेवारी राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट मध्ये आज पोलीस स्टेशन रायपुर च्या वतीने नवीन फौजदारी कायदे संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. श्री दुर्गेश राजपूत साहेब व प्रमुख मार्गदर्शक वक्ते मा.मोहम्मद बशीर सर (सरकारी विधी अधिकारी कोर्ट,चिखली)

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

Buldhananews:तसेच शाळेचे सहाय्यक शिक्षक राजेश गायकवाड तसेच फारूक शेठ, इजाज भाई, बालाप्रसाद जयस्वाल, मोहम्मद शमीम, विठ्ठल सोनवणे, सुनील खंडारे त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्ती व पोलीस पाटील व पत्रकारांची उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.मोहम्मद बशीर साहेब यांनी नवीन कायदे यामध्ये, भारतीय न्याय संहिता कायदा-2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता -2023 त्याचप्रमाणे भारतीय साक्ष अधिनियम-2023 या मध्ये झालेले परिवर्तन त्याप्रमाणे जुन्या कायद्यामध्ये असणाऱ्या नियम या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले.

*त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष राजपूत साहेब यांनी रायपूर पोलीस स्टेशन च्या माध्यमातून विविध कार्यक्रम जिजाऊ ज्ञान मंदिर मध्ये घेतले जातात विद्यार्थी जनजागृती, सुरक्षा सप्ताह, विशेष मुलींसाठी कार्यशाळा, इत्यादी व इतरही कार्यशाळा व शिबीरे च्या माध्यमातून विद्यार्थी कायद्याबाबत जागृत झाले पाहिजे त्यांना पोलिसांचे कार्य माहित असले पाहिजे त्यांचा सर्वांगीण विकास घडला पाहिजेत त्याचप्रमाणे विविध दैनंदिन जीवनातील उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमासाठी पोलीस स्टेशन रायपुर येथील श्री कमळकर सर, श्री काकडे सर श्री पडघान सर पोलीस स्टेशन रायपूरचे कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी , प्राध्यापक व शिक्षक यांची उपस्थिती होती.

Buldhananews :या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष संदीपदादा शेळके व शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी कार्यक्रम सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भुसारी यांनी केले.

Leave a Comment