बीबी बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी.( busnews )

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

busnews:बीबी बस स्थानकावर वाहतुकीची नेहमी कोंडी होत असून मुख्य बाजारपेठेही बस स्थानक परिसरात असल्यामुळे छत्रपती संभाजी नगर ते नागपूर जाण्यासाठी सोयीस्कर असा मार्ग बीबी येथूनच जात असल्यामुळे या महामार्गावर नेहमी वाहतुकीची वर्दळ असते त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होताना दिसते.

पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे बंद करा ( policenews )

बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र खाजगी वाहनधारक कोणाचीही भीती न बाळगता रोडवरच वाहने उभी करून इतरत्र फिरत असतात . गाडी रोडवरच उभी करून गप्पा मारत उभी असतात.

खाजगी फेरीवाले सुद्धा चार चाकी वाहनांमध्ये फिरते माल विक्रेते बिनधास्त रोडवर उभी करून मालाची विक्री करतात .त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे कोणीही पालन करताना दिसत नाही .त्यामुळे एखाद्यावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याकरिता वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी व वाहनधारक करत आहेत .

busnews:तसेच बस स्थानक परिसरात वाहतूक पोलिसांची गरज भासत असल्याचेही प्रवाशी वाहनधारकांकडून बोलल्या जात आहे.

Leave a Comment