शेगाव प्रिमियम लिग.. शेगाव तालुका पत्रकार क्रिकेट संघाचा रोमांचक सामन्यात दणदणीत विजय ( Cricket )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

Cricket: शेगाव .येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मंडळाकडून आयोजित प्लॅस्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेत आज 28 जानेवारी रोजी दु. १ वा. शेगाव तालुका पत्रकार संघ (कर्णधार नानाराव पाटील) व रोटरी क्लब शेगाव (कर्णधार सचिन गाडोदिया) यांच्यामध्ये विशेष सेलिब्रिटी सामना रंगला होता.

शेगाव तालुका पत्रकार संघाच्या टीमने रोटरी क्लबला 30 धावांवर रोखण्यात यश आले.६ षटकात रोटरी क्लब टिमने 30 धावा रचल्या.

मात्र शेगाव तालुका पत्रकार संघाने 4 ओव्हर मध्येच 31 धावांचे लक्ष पूर्ण करून रोटरी क्लबवर दणदणीत विजय मिळवला.

मनोज जरांगेची काय औकात नाही, तर त्यांची लायकी नाही. ते जरांगे यांना आता कोणाकडून होतं आहे आव्हान ( manojjarange )

या संघामध्ये नानाराव पाटील (कर्णधार) मंगेश ढोले (उपकर्णधार) ज्येष्ठ पत्रकार विजय कुलकर्णी, नारायण दाभाडे, नितीन घरडे, ज्ञानेश्वर ताकोते, संजय त्रिवेदी, प्रशांत खत्री, देविदास पुंडगे, प्रणव दिनेश महाजन, यज्ञेश नानाराव पाटील, अमोल हिरळकर, सोमेश ठाकूर या खेळाडूंचा समावेश होता.

या अतिशय रोमहर्षक सामन्यांमध्ये शेगाव तालुका पत्रकार संघाच्या टीमने दणदणीत विजय मिळवताच सर्व पत्रकारांनी आनंदोत्सव साजरा केला. या विशेष सामन्यांसाठी तीन हजार रुपयांचे बक्षीस सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोरखडे यांचेकडून जाहीर करण्यात आले होते,

 

https://youtu.be/tmhdJCUiduU

 

Cricket: आमदार संजय कुटे यांच्या हस्ते तीन हजार रुपयांचे रोख बक्षीस व कप यावेळी तालुका पत्रकार संघाच्या टीमला देण्यात आला.

Leave a Comment