लाल बाबा देवी मंदिरातील मूर्तीला चांदीचा मुकुट का बसू देत नाही असे म्हणून मुरारका यांना घरात घुसून मारहाण; १० जणांविरुध्द गुन्हा. /Crime news  ..

 

 

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

शेगाव: अकोट रोड वरील लाल बाबा देवी मंदिरात मूर्तीला चांदीचा मुकुट का बसू देत नाही असे म्हणून येथील प्रख्यात शैक्षणिक संस्थेचे संचालक असलेले सतीश कुमार उर्फ छोटू मुरारका यांना त्यांच्या जागीच उपस्थित घरामध्ये घुसून आठ ते दहा लोकांनी मारहाण केली व देशातील मोबाईल एटीएम कार्ड नवी 24 हजार 680 रुपये याचप्रमाणे मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या गोपाळ चौधरी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपस केल्याची व घरातील महिलांना लोटपोट करून सामानाची नासधूस केल्याची तक्रार सतीश मुरारका यांनी केली या प्रकरणी मेडिकल रिपोर्ट व आलेल्या तक्रारीवरून कलम 452 323 324 143 147 148 149 327 427 341 504 506 भादवी नुसार गजानन नाईकवाडे प्रमोद सोड व आठ ते दहा जनाविरुद्ध अधिक तपास सुनील अंबुलकर साहेब करीत आहेत

 

शेगाव शहरातील लालबाबा देवी मंदिरातील मूर्तीला चांदीचा मुकुट का बसवू देत नाही, असे म्हणत गांधी चौकातील मुरारका यांच्या घरावर ८ ते १० जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून प्रवेश केला व सतीश कुमार मुरारका यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत घरातील महिलांनाही लोटपाट केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड व नासधुस करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, खिशातील नगदी पैसे, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असे साहित्य झटापटीमध्ये काढून नेले. सदर घटना २८ ऑक्टोबर रोजी

■ तर जातीवाचक शिवीगाळची महिलेची मुरारका विरुध्द तक्रार

संध्याकाळी साडेचार वाजे दरम्यान घडली.

याबाबत सतीश कुमार नंदकिशोर मुरारका यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारमध्ये नमूद केले आहे की, शहरातील गजानन नाईकवाडे व प्रमोद सुळ तसेच आठ ते दहा जणांनी माझे घरात घुसून लालबाबा देवी मंदिरातील मूर्तीवर मुकुट का बसवू देत नाही, या कारणावरून वाद घालून १० इसमांनी अचानक हल्ला चढवत मला मारहाण केली.

तसेच खिशातील मोबाईल, एटीएम, नगदी २४ हजार ६८० तसेच मध्यस्थी करण्यास आलेल्या गोपाल चौधरी यांचे गळ्यातील सोन्याची चैन महिलांना लोटपोट करून घरातील सामानाची नासधूस केली. यावरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ४५२, ३२३, ३२४, १४३, १४७ १४८, १४९, ३२७, ४२७, ३४१, ५०४, ५०६ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार सनील

अंबुलकर करत आहेत. तर या विरुद्ध सौ. ज्योती

अमोल तायडे वय २६ राहणार शिवाजीनगर सरकारी फैल शेगाव यांनी तक्रार दिली की, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेदरम्यान अकोट रोडवरील लालबाबा देवी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेली असता सतीश कुमार उर्फ छोटू मुरारका यांनी तू मंदिरात येऊ नको, ‘तू खालच्या जातीची आहेस’, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून मंदिरातून बाहेर काढून दिले व माझा व माझे जातीचा अपमान केला, अशी तक्रार दिली. उशिरा रात्रीपर्यंत याप्रकरणी कारवाई सुरू होती. Crime news

Leave a Comment