Crimenews एअर रायफल चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

देऊळगाव राजा (बुलढाणा) : स्थानिक
जुना जालना रस्त्यावरील एअर रायफल व पिस्टूल विक्रीच्या दुकानातून ८ एअर रायफल व २२ पिस्टूल चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेवून ८ एअर रायफल व १७, असा एकूण १ लाख २७ हजारांचा माल जप्त केला आहे.

याप्रकरणी तक्रारदार रवींद्र धन्नावत यांनी १६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून जुना जालना रस्त्यावरील एअर रायफल व पिस्टूल विक्रीच्या दुकानातून ८ एअर रायफल व २२ पिस्टूल चोरी गेल्याची तक्रार दिल्यावरून देउळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये कलम ४६१, ३८०, ३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे यांच्याकडे देण्यात आला.

दरम्यान, २७ नोव्हेंबर रोजी काही मुले बंदुक घेवून बायपासवर फिरत असल्याच्या माहितीवरून तपास अधिकारी चिरडे व डिबी पथकाने तत्काळ संशयीत आरोपी रोशनसिंग बबलुसिंग टाक (वय २०),
रा. संजय नगर देऊळगाव राजा व हिरासिंग मोहनसिंग बावरे (वय १९) रा. विवेकानंद कॉलनी देऊळगाव राजा यांना ताब्यात घेतले.

यावेळी त्यांच्या जवळील एअर रायफल ताब्यात घेवून त्यांना विचारपूस केली असता चोरी केल्याचे कबूल करून २८ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष उर्वरीत १७ एअर पिस्टल व ८ एअर रायफल, असा एकूण १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून ताब्यात घेण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुनील

कडासने, अपर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधीकारी अजयकुमार मालवीय, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे, दत्ता नरवाडे, रामकिसन गिते, भगवान नागरे, विश्वनाथ काकड, माधव कुटे, गणेश जायभाये, सैयद मुसा, नापोकॉ अनिल देशमुख, महिला पोलीस अंमलदार शितल नांदे, चालक पोहेकॉ सुभाष मुंढे व विजय दराडे आदींनी केली.crimenews

Leave a Comment