Crimenews /१७ वर्षांपासून शासकीय जागेचे भाडे थकीत असल्याचा आरोप; २० लाखांहून अधिक वसुली रखडल्याने खळबळ

0
1

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा : सिंदी (रेल्वे)
लघु पाटबंधारे विभाग येथील शासकीय वसाहत व कार्यालयीन जागेचे भाडे मागील तब्बल १७ ते १८ वर्षांपासून थकीत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या थकबाकीमुळे शासनाचे सुमारे २० लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर विठोबाजी वाघमारे यांनी मुख्य अभियंता, लघु पाटबंधारे विभाग (दक्षिण विभाग), नागपूर यांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे.
सन २००८ मध्ये पळसगाव (बाई) येथील एका संस्थेला सिंदी (रेल्वे) येथील लघु पाटबंधारे विभागाची वसाहत व कार्यालयीन जागा ३० वर्षांच्या करारावर देण्यात आली होती.wardhanews

वार्षिक अंदाजे ६८,८०० रुपये भाडे निश्चित असतानाही, पहिल्या वर्षानंतर कोणतेही भाडे भरले गेले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

याच ठिकाणी शिष्यवृत्ती घोटाळ्याशी संबंधित तपास सुरू असताना काही कागदपत्रे जाळल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद आहे. तसेच इमारतीतील दरवाजे व खिडक्या चोरीला गेल्याच्या घटनांवरही संशय व्यक्त करण्यात आला असून, याबाबत विभागाकडून कोणतीही ठोस नोंद नसल्याचा दावा करण्यात आला आहे.hingnghatnews

याशिवाय, संबंधित संस्थेच्या माध्यमातून बोगस संस्था स्थापन करून शिष्यवृत्ती निधीचा गैरवापर झाल्याचा तसेच त्या निधीतून शासकीय जमिनीच्या शेजारी खासगी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात शासकीय मालमत्तेचा गैरवापर, महसूल बुडवणे आणि संभाव्य आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करत, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून थकीत भाडे तात्काळ वसूल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.crimenews

Crimenews /दरम्यान, या प्रकरणाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक व संबंधित लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here