इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव: ग्रामीण पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अज्ञात आरोपीकडून लैंगिक अत्याचार झाल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची घटना उघडकिस आली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार एक अल्पवयीन बालिका वय अंदाजे साडेसोळा वर्ष हि शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावामध्ये फिरत असल्याची माहिती शेगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली या माहितीवरून साक्षीदार पोलीस पाटील यांनी नमुद बालीकेस पोस्टेला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन आणुन हजर केले.
सदर बालीकेस मा बाल न्यायालय अध्यक्ष बुलढाणा यांचे आदेशाने तिला सखी वन स्टाप सेंटर बुलढाणा यांचेकडे दाखल करुन आज रोजी वैदयकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांचेकडे पिडीतेची लैंगीक अत्याचाराबाबत वैदयकीय तपासणी करण्यात आली . वैदयकीय अधिकारी सामान्य रुग्णालय बुलढाणा यांनी सदर पिडीत बालीका हिचेवर लैंगीक अत्याचार झाला असुन ति 29 आठवड्याची गर्भवती असुन तिचे वय साडेसोळा वर्षाच्या आतील आहे.
असे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्याकडून ग्रामीण पोलीस स्टेशनला प्राप्त झाले सदर पिडीत बालीका हिचेवर कोणीतरी अज्ञात इसमाने लैंगीक अत्याचार करुन तिला गर्भवती ठेवुन पो स्टे शेंगाव ग्रामीण हददीत ग्राम येथे सोडुन दिल्याने आज रोजी प्राप्त झालेल्या मेडीकल सर्टीफीकेटवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात आरोपी विरुद्ध अप नंबर 300/2023 कलम कलम 376,376(2) जे, एल, भादवी सहकलम 4,6,12 पोस्को सन 2012 अन्वय गुन्हा दाखल करुन सदर गुनह्याचा तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पो नी दिलीप वडगावकर ठाणेदार करीत आहेत.crimenews