Crimenews भटकंती करणाऱ्या पीडितेवर अज्ञाताच्या कुकृत्यामुळे निघाली पीडिता सात महिन्यांची गर्भवती

0
822

 

धक्कादायक न्यूज

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अज्ञात नराधमाने केलेल्या कुकृत्यामुळे भटकंती करणारी १६ वर्षीय पीडिता अत्याचार सात महिन्यांची गर्भवती असल्याचा समोर आला प्रकार बुलढाणा जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीतून सत्य समोर उघड झाला.

याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलिसात गुरुवारी अज्ञात नराधमावर अत्याचारासह पोक्साेअंतर्गत वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आला.

शेगाव तालुक्यातील गौलखेड येथील पोलिस पाटील यांनी भटकंती करणाऱ्या अनोळखी पीडितेस शेगाव ग्रामीण पोलिसात दाखल केले. त्या बालन्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी तिला बुलढाणा येथील सखी वनस्टाॅप सेंटर येथे दाखल करण्यात आले. पुढील तिची वैद्यकीय तपासणी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली.व त्यामध्ये ती २९ आठवड्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.व तिचे वय साडेसोळा वर्षेच सांगण्यात आले.

https://www.suryamarathinews.com/यावल-फैजपुर-रस्त्यावर-चा/

रुग्णालयाच्या प्रमाणपत्रानुसार तिच्यावर अज्ञात नराधमाने बरेच वेळा अत्याचार करून गौलखेड हद्दीत सोडून दिल्याचेही माहिती समोर आली. त्यावरून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी ipc भादंविच्या विविध कलमांसह पोक्साे सहकलम ४,६,१२ पोक्साेअंतर्गत गुन्हे दाखल केले. पुढील तपास ग्रामीणचे ठाणेदार दिलीप वडगावकर करीत आहेत.crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here