जिल्हा हादरला सासऱ्यांनेच नातवासह गर्भवती सुनेची केली हत्या / ( crimenews )

 

crimenews: बुलढाणा: वयोवृद्ध इसमाने आपल्या गर्भवती सुनेचा व नातूची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना आदिवासीबहुल संग्रामपूर येथे आज घडली.

यामुळे तालुक्यासह बुलढाणा जिल्हा हादरला आहे.
याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

यामुळे घटनेचा तपशील कळू शकला नाही. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार
संग्रामपूर शहरात आज २३ जानेवारी रोजी ही घटना घडली. यामध्ये ६५ वर्षीय आरोपी नारायण गायकी याने राहत्या घरातच आपली गर्भवती सून अश्विनी देवानंद गायकी व नातू समर्थ गायकी यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.

महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर; शेकडो रुग्णांना जीवदान ( eknathshinde )

यामुळे ८ वर्षिय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीररीत्या जखमी झाली. अश्विनीला रुग्णवाहिका द्वारे प्रथम वरवट बकाल येथे व नंतर शेगाव येथील सईबाई मोटे उप जिल्हा रुग्णाला नेण्यात आले होते.

 

crimenews: मात्र अखेर तिचा मृत्यू ओढवला.आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिपक सोळंके करीत आहे. वृत्त लिहे पर्यत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता .

Leave a Comment