प्रतिनिधी/मुर्तिजापूर विलास सावळे
तीन वर्षापासून आपल्या अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करणाऱ्या वडिलांनी अखेर ३१ मार्चला रात्री ९ वाजता मुर्तिजापूर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना मुर्तिजापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली.
मुर्तिजापूर पोलिस स्टेशनला अल्पवयीन पीडित १४ वर्षीय फिर्यादी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ९ वीत असताना फिर्यादीची आई स्वयंपाक करीत असताना आरोपी वडील पीडित मुलीला घरातील दुसऱ्या खोलीत नेऊन तिच्याशी लगट करीत असे.तसेच अल्पवयीन पीडितेला मासिक पाळी सुरू झाल्यानंतर आरोपीने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले.
याबाबत कोणालाही काही सांगितले तर तुझ्या आईला जीवे मारण्याची धमकी देत होता.तसेच फिर्यादी पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारिरिक संबंध ठेवले.हा प्रकार २०२२ ते १६ मार्च २०२५ पर्यंत दारू पिऊन आरोपीने नेहमी करीत असे.तसेच मासिक पाळी येते का? याबाबत विचारत असे.
Crimenews :परंतु या महिन्यात पीडितेला मासिक पाळी न आल्याने पीडितेच्या आईने तिला विचारल्यावरून अल्पवयीन पीडितेने सर्व हकीकत प्रमाणे फिर्यादीचे जबानी रिपोर्ट तसेच पोलीस स्टेशन बडनेरा व मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला आरोपी वडीलाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.